देहूरोड कँन्टोन्मेन्ट कार्यालयात सिद्धिविनायक नगरी पाणी योजना मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकांऱ्याबरोबर निविदा काढण्या संबधी चर्चा , बैठकित देहूरोड कँन्टो.बोर्डा चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांची विविध समस्यांपुर्तीची मागणी

देहूरोड दि.7जुलै :-

   मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी देहूरोड कँन्टोन्मेन्ट कार्यालयात आयोजित विकास कामांचा आढावा बैठकित देहूरोड कँन्टोन्मेन्ट हद्दीतील सिद्दिविनायक नगरी मंजुर पाणी योजना मार्गी लावण्यासाठी देहूरोड कँन्टोन्मेन्ट बोर्डा चे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकांर्याशी निविदा काढण्या बाबत चर्चा करून निविदा प्रक्रिये नंतर पाणी योजना लौकरात लौकर मार्गी लावण्याच्या अधिकार्यांना सुचना दिल्या. आमदार सुनिल शेळके यांनी सिद्दीविनायक नगरी पाणी योजनेसाठी ५कोटी रूपयाचा निधी त्यांच्या विकास निधीतुन दिला आहे. या बैठकित देहूरोड कँन्टोन्मेन्ट बोर्डा चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांनी केंद्र शासनाकडे थकीत जी.एस.टी.मुळे बोर्ड आर्थीक संकटात आहे. विकासात्मक कामे थांबली आहेत. त्या साठी महाराष्ट्र शासना तर्फे पाठपुरावा करून जी.एस.टी निधी उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्या पुढे मांडली . जागे अभावी विज सब स्टेशन चा प्रस्ताव गेली अनेक वर्षा पासुन रखडले आहे. ते पुर्ण होण्यासाठी देहूरोड कँन्टोन्मेन्ट बोर्डाने जागा उपलब्ध करून देण्याची सुचना आमदार सुनिल शेळके यांनी दिली. तर निधीतुन सर्व शाळाच्या दुरूस्ती कामाची सुरवात होत असल्याचे सांगण्यात आले. या बैठकिच्या चर्चेत बोर्डाचे प्रशासक अँड.कैलाश पानसरे यांनी भाग घेतला. या बैठकित बोर्डाचे अधिक्षक राजन सावंत सह संबधित अभियंता,अधिकारी, राष्ट्रवादी देहूरोड शहराध्यक्ष अँड.प्रविण झेंडे ,माजी अध्यक्ष अँड.कृष्णा दाभोळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला देहूरोड शहर अध्यक्षा अरूणा पिंजण ,युवा नेते अतुल मराठे,शिवसेना शाखा देहूरोड प्रमुख भरत नायडु राष्ट्रवादी पदाधिकारी बाळासाहेब जाधव, रेणु रेड्डी, विजय पवार,जाफर शेख, दीपक चौगुले, हिरामण सांळुके,आदी उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations