देहु येथे बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई १३ जण अटक
एकुण ९९ हजार ३६५ रुपयेचे मुद्दे माल जप्त , जुगार अड्डा चालवणारे दोघेजण फरार.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

पुणे दि. १४ :-  देहूरोड बाजार पेठ येथे ऑनलाईन लाॅट्री वर सामाजिक सुरक्षा पथकाने धाड टाकुन सहा जणांना अटक केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होते. आता देऊन मध्ये ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार सेंटरवर सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवार दिनांक १३ रोजी छापा टाकला या कारवाईत ९९ हजार ३६५ रुपयांच्या मुद्देमाल जप्त केले.

 या मुळे जुगार खेळण्या-या व जुगार अड्डा चालवणारे यांच्या मध्ये चांगलेच घबराट पसरले आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या बाबत कडक पाऊले उचलले दिसत आहे या कारवाईत १५ जणांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. दिलीप जगन्नाथ काळोखे (वय ५२ रा. काळोखे नगर वडाचामळा देहुगाव तालुका हवेली जिल्हा पुणे), विजय बापू घुंडरे (वय वर्ष ५१,रा.सागर डेअरी मागे देहुगाव तालुका हवेली जिल्हा पुणे) ,आदिनाथ सदाशिव गायकवाड (वय वर्ष ४०,रा.हगवणे आळे देऊगाव तालुका हवेली पुणे), भागवत नारायणराव यादव (वय ४८), प्रशांत वासुदेव बोबसे (वय ४३), मिलिंद प्रकाश दांडगे (वय ४५), अक्सर युराफ आत्तार (वय वर्ष ६३), दिलीप बाळू गवारे (वय ६२), सर्व राहणार देहुगाव तालुका हवेली जिल्हा पुणे, दिवाकर अनुज सिंग (वय वर्ष २३ सध्या राहणारा यमुनानगर निगडी पुणे), आकाश सदाशिव राऊत (वय २९ तळवडे), संदीप नातू वाडेकर (वय वर्ष ५१,राहणार व-हाळे तळेगाव), हेमचंद्र नारायण जठार (वय ६६ ),आणि रमेश गोविंद भंडारी (वय वर्ष ५९ राहणार तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे), असे जुगार अड्ड्यावर अटक केलेल्यांची नावे आहे. तर लॉटरी मालक कुंदन पूर्ण नाव पत्ता माहीत नाही (वय वर्ष ३०,रा. निगडी पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस हवालदार बाबासाहेब क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार देहुगाव येथे सागर दूध डेअरी मागील राजाराम काळोखे यांचा इमारतीमध्ये बालाजी लॉटरी सेंटर सुरू होते इलेक्ट्रॉनिक्स व्हिडिओ गेम मशीन वरील आकड्यांवर पैसे लावण्यास सांगून तसेच ऑनलाइन लॉटरीच्या नावाने जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली सोमवारी दुपारी पथकाने छापा मारला या कारवाईत सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी २३ हजार ३५० रुपये रोख रक्कम पंधरा रुपये किमतीचे जुगार खेळण्याचे साहित्य ७६ हजार रुपये तसेच विविध कंपनीच्या सात व्हिडिओ गेम मशीन कीबोर्ड, माऊस, एलईडी, टीव्ही असा एकूण ९९ हजार ३६५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा  विभागाचे पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सींग सिसोदे, पोलीस अमलदार विजय कांबळे ,संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मोठे, अनिल महाजन, संगीता जाधव, मारुती करचुंडी, राजेश कोकाटे, गणेश कारोटे यांनी केली आहे.

YOUR REACTION?