सुनेच्या छळ प्रकरणी काँग्रेस आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ.
सुने ने मानसिक त्रास, मारहाण, करत एक कोटी रूपयेची मागणी केल्याचे पोलीसात तक्रार दिले

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

 कराड दि. १२ :- कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व करवीर चे काँग्रेसचे आमदार पांडुरंग निवृत्‍ती उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह तिघांन वर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 याप्रकरणी आमदार पाटील यांची सून आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आदिती राजेश पाटील यांनी आपला छळ होत आहे अशी तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये आमदार पाटील यांचा मुलगा राजेश आणि मुलगी टीना महेश पाटील यांचा समावेश आहे या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबियाकडून आदिती यांना शिवीगाळ मारहाण करत एक कोटी रुपयाची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून आमदार पी. एन. पाटील यांच्यासह आदीती ह्याचे पती राजेश पाटील ,टिना महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पती राजेश पाटील सासरे पी. एन. पाटील आणि टिना पाटील यांनी संगनमताने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला असे फिर्यादीत आदिती पाटील यांनी म्हटले आहे. फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारच्या विविध कलमान्वये आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. 

आदिती ह्या राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर कराड येथील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत सुनेचा छळ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत कराड पोलीस अधिक तपास करत आहे

YOUR REACTION?