मुंबई कडे भरघाव वेगाने जाणाऱ्या एशीयाड बसने समोरिल दूचाकी स्वारला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार.
बस चालक न थांबता भरघाव वेगात पुढे निघुन गेला.देहूरोड वहतुक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर यादव व त्यांचे सहकारी दाखल पुढील शोध सुरू.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

 देहूरोड दि. ०८ :- मुंबई कडे भरघाव वेगात समोरच्या वहानांना मागे टाकत पुढे  जात असताना समोरील दुचाकी स्वाराला धडक दिल्याने  दुचाकी स्वाराच्या डोक्या वरून बसचे चाक गेल्याने चिराग  इंगवले(वय २५ रा. पिपळे निलख विठ्ठल मंदिर शेजारी) हा युवक जागीच ठार झाला. ऐशियाड बस क्रंमाक एम. एच. १४ जी. टी. ४९०७ पेण लिहलेला अपघात केल्या नंतर ऐशियाड बस चालक घटनास्थळी न थांबता पुढे सोमाटणे टोल नाका पास करून पुढे निघुन जात असताना देहूरोड श्रीकृष्ण नगर मधील अस्लम शेख या युवकाने दुचाकी वरुन ऐशियाड बसचा पाठलाग करून थांबविण्याचा प्रयत्न केला.पण ऐशियाड बस चालक न जुमानता भरघाव वेगात पुढे निघून गेला.                                  

 घटनेची खबर मिळताच देहूरोड वहातुक विभागाचे  सहा.पोलिस उपनिरीक्षक किशोर यादव व त्यांचे सहकारी दाखल झाले आहेत. व.पुढील कार्यवाही करून फरार ऐशीयाड  बस चालकाचा शिघ्र गतीने शोध घेत आहेत. 

वृत्त संपादन अशोक कांबळे बातमी व जाहिराती साठी संपर्क 7219500492

YOUR REACTION?