किवळे   प्रभाग सोळा देहूरोड विकास नगर मध्ये  झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार चौकशी करावी -:  अर्चना राऊत.
थातूर-मातूर व निष्कुष्ठ दर्जाचे काम केल्याने काम बघुन ठेकेदाराला बील अदा करावे , दोषी आढळले तर संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

 देहूरोड दि. ७ ऑगस्ट पिंपरी-चिंचवड महापालिका किवळे विकास नगर प्रभाग १६ विकास नगर मधील सार्वजनिक कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.त्या निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करावी .अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा अर्चना राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तां कडे निवेदना द्वारे केली आहे.                                      पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात अर्चना राऊत यांनी म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग १६ विकास नगर मधील पेंडसे कॉलनी, टी.सी.काॅलनी, रेणुका हाॅटेल, प्रगती काॅलनी, नेटके काॅलनी,भारत रत्न सोसायटी या वसाहतीत आठ दिवसा पुर्वी व मागच्या महिन्यात पेव्हर ब्लॉक व गटारे,चेंबर दुरूस्ती ची काम केली आहेत. 

   पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकुण ६४ प्रभाग आहेत. त्या अनेक प्रभागात रंगी बिरेंगी पेव्हिंग ब्लाक बसविले आहेत .पण येथे मात्र ठेकेदाराने भंगार सिमेंटचे व निकृष्ठ दर्जाचे ब्लाॅक बसविलेत. तसेच ब्लॉक चे काम पुर्ण होण्या अगोदरच पहिल्या पाऊसात ठिक, ठिकाणी ब्लाक पुर्ण पुणे उखडलेले आहेत. ठेकेदाराने ब्लॉक बसविले नंतर त्याच्या बाजुने मजबुती साठी सिमेंट क्राॅकिट भरावयावयाला पाहिजे होते ते त्यांनी केले नाही. गटार व चेंबर ची पाहणी केली असता  ठिक ठिकाणी  जुने व खराब चेंबर बसविले आहेत. अशा प्रकारे ठेकेदाराने काम चुकार थातुर  मातुर काम केले आहे. या निकृष्ट कामा संबंधी संबंधित ठेकेदार मोटवानी व पिंपरी-चिंचवड महापालिका संबंधित अधिकारी गिरडे यांना निकृष्ट कामाचे फोटो व तोंडी तक्रार वारंवार करुन ही त्यांनी दखल न घेता उडवा उडवीची उत्तर दिले.  आपण ठेकेदाराला केलेल्या थातुर मातुर निकृष्ट दर्जाचे कामाचे बिल अदा करु नये कामाची पाहणी करूनच बिल अदा करावे .जर दोषी आढळल्यास ठेकेदार व संबंधित लोका विरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी.असे राष्ट्रवादी काँग्रेस चे महिला नेत्या अर्चना राऊत यांनी निवेदनात म्हंटले आहे.                                                              वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे. 

बातमी व जाहीराती साठी संपर्क साधा 7219500492

YOUR REACTION?