अभिनेत्री करीना कपुर यांनी प्रकााशित केलेल्या "माय प्रेग्नंसी बायबल" या वादग्रस्त पुस्तकातून बायबल शब्द वगळावा अन्यथा ख्रिस्ती समाजाच्या वतीने सर्वत्र तीव्र आंदोलन :- पास्टर सलोमनराज भंडारे.
बायबल हा शब्द न वगळे तर अभिनेत्री करीना कपुरच्या मुंबई निवासस्थान येथे सर्व ख्रिस्ती बांधवाच्या वतीने जोरदार आंदोलन करुन करिना कपुर सहित लेखक व प्रकाशक यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल.

 देहूरोड दि. २३. अभिनेत्री करीना कपुर यांनी प्रकाशित करीत असलेल्या पुस्तकाला प्रेगन्सी बायबल मथळा देऊन भारतातील नव्हेतर जगभरातील ख्रिस्ती समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. चित्रपट जगात कुठल्या न कुठल्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी अभिनेता अभिनेत्री उपाय शोधून मिडीयावर काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करत राहतात सामाजाचा भान न ठेवता चुकीचे कृत्ये करतात  पुस्तका वरील बायबल शब्द न वगळल्यास ख्रिस्ती समाजाच्या वतीने अभिनेत्री करीना कपुर (खान) यांच्या निषेधार्थ जो पर्यंत पुस्तकावरील बायबल शब्द वगळत नाही तो पर्यंत सर्वत्र तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ख्रिस्ती समाजाचे नेते पास्टर सलोमनराज भंडारे यांनी देहूरोड येथे निषेध सभेत दिला.                  

अभिनेत्री करीना कपूर (खान) हिने "माय प्रेग्नंसी बायबल" हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशित केले आहे त्या पुस्तकाला ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबलचे नाव या पुस्तकाला जोडल्याने ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी देहूरोड समस्त ख्रिस्ती समाज व ख्रिश्चन एकता मंच यांच्या वतीने देहूरोड स्वामी विवेकानंद चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध सभेत प्रारंभी अभिनेत्री करीना कपूर  यांनी ख्रिश्चन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल तीव्र निषेध करून करीना कपुर हाय हाय ,पुस्तकावरील बायबल शब्द वगळलेच पाहिजे .अशा जोरदार घोषणा देऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. "बायबल हा पवित्र ग्रंथ, देवाचे वचन आहे. देवाचे महान सेवक व प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने हा ग्रंथ लिहिला आहे त्यामुळे या पवित्र ग्रंथाचे नाव जगातील इतर मानवनिर्मित पुस्तकांशी जोडणे हा मोठा निंदनीय अपराध आहे. असा अपराध, विकृत निंदनीय कृती अभिनेत्री करीना कपूरने केल्याने तिने ख्रिश्चन समाजाची जाहीर माफी मागून आपल्या पुस्तकाला जोडलेला बायबल शब्द वगळावा. अन्यथा करीना कपूरसह लेखक व प्रकाशक या सर्वांवर आय.पी.सी.२९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा" असे मत ख्रिश्चन एकता मंचचे मावळ तालुका अध्यक्ष पास्टर डाॅ.सुनिल साठे यांनी करुन आपला तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच पोलीसांनी अभिनेत्री करीना कपूर विरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास २७ जुलैला करीना कपूरच्या मुंबई येथील घरासमोर ख्रिश्चन एकता मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.प्रभूदास दुप्ते यांच्या नेतृत्वाखाली सर्व ख्रिस्ती संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल .असा इशारा डाॅ.साठे यांनी दिला.पास्टर राजेंद्र कदम यांनी प्रार्थना केली.यावेळी  बिशप एम.बी.मनोज, पास्टर विकास जावळे, ब्रदर शिमोन वाघमारे, ख्रिश्चन समाजातील पास्टर, व ख्रिस्ती  बांधव बहु संख्येने उपस्थित होते. 

 वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे. 

YOUR REACTION?