आमदार रोहीत पवार यांचा सातासमुद्रापार डंका, वर्ल्ड  बुक ऑफ रिकाॅर्ड लंडन तर्फे जागतिक सन्मान.
वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड ने सन्मानित झाल्याने रोहित पवार यांच्या वर अनेक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव

वृत्त प्रतिनीधी चंद्रशेखर पात्रे

पुणे दि. २१ जुलै. कर्जत जामखेड मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार रोहित पवार यांनी कोरोना महामारी च्या काळात आपल्या मतदारसंघासह संम्पूर्ण महाराष्ट्रात जे मानवतापूर्ण कार्य केले त्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ़ रिकॉर्ड लंडन ने घेऊन त्यांना सर्टिफिकेट ऑफ़ कमिटमेंट ने सम्मानित करण्यात आले.

          आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहे.  त्यांच्या कामाचा डंका देशातच नव्हे तर सातासमुद्रापार वाजत आहे. वर्ल्ड बुक ऑफ़ रिकॉर्ड लंडन कडून सम्पूर्ण जगातील शंभर देशांमध्ये Globle Pledge campaign हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कोरोना महामारी च्या काळात प्रभावी व सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सम्मान जागतिक स्तरावर केला जात आहे.

  आमदार रोहित पवार यांना हा पुरस्कार मिळाल्या मुळे कर्जत-जामखेड मतदारसंघा सह सम्पूर्ण महाराष्ट्रातुन आनंद व्यक्त केला जात आहे.व त्यांच्या वर अनेक स्तरावरून  आमदार रोहित पवार यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

या जागतिक उपक्रमात आमदार रोहित पवार यांनी केलेले कार्य देखील नोंदवले गेले आहे. विविध कामांची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ़ रिकॉर्ड पुरुस्काराने आमदर रोहित पवार यांचा गौरव करण्यात आले आहे. वर्ल्ड बुक ऑफ़ रिकॉर्ड चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद, वर्ल्ड बुक ऑफ़ रिकॉर्ड होल्डर आदम सय्यद आणि मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

YOUR REACTION?