दौंड पोलिस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही:-वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण पवार
दौंड पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असणाऱ्या अवैध धंद्याच्या विरोधात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी जोरदार मोहीम राबविली आहे.

पुणे, दौंड दि.18जुलै (वृत्तप्रतिनिधी :-चंद्रशेखर पात्रे)

गेल्या पंधरा दिवसापासून दौड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत 15 दिवसांत अवैध वाळू, अवैध दारू, मटका, जुगार आदि प्रकारचे 34 गुन्हे दाखल केल्या बद्दल दौंड तालुक्यातून त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा होत आहे

मटका, जूगार, अवैध दारू विक्री , अवैध वाळू अन्य अवैध धंदे तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या वरती कडक मोहीम राबवून कडक स्वरूपात कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . काळे धंदे करणान्यांना चांगलीच चपराक बसली असून याही पुढे ही अशाच धडक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी जस्ट आज च्या प्रतिनिधीला माहिती दिली आहे.3 गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांना हद्दपार करणार असुन त्यामूळे कुणीही समाजकंटक ,उपद्रवी व्यक्ती दहशतीपोटी डोकेवर काढण्याचे धाडस करणार नाहीत .

YOUR REACTION?