बकरी ईद निमित्त शेजारील राज्यातून महाराष्ट्रात विक्री साठी येणाऱ्या बकऱ्याच्या वाहना ला राज्या च्या सीमे वर न अडवता नियमाचे पालन करुन वाहतुकी ची परवानगी द्यावी :- म. गौस सोनार
बकरीईद च्या पाश्चर्वभूमी वर प्रशासनाने महाराष्ट्राच्या सीमे वर वाहनांना ताटकळत ठेऊ नये, कोरोना गाइडलाइन प्रमाणे तापसणी करुन प्रवेश द्यावा:-हाफ़िज़ अनवरअली

पुणे, मावळ दि.15जुलै (वृत्तप्रतिनिधी :-चंद्रशेखर पात्रे)

आगामी 21जुलै ला मुस्लिम धर्मियांचा पवित्र बकरीईद (ईदुल-अजहा) चा सण येत आहे.गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावा मुळे महाराष्ट्र शासनाने राज्या च्या सीमे वर नाकाबंदी केलेली होती.त्यावेळी नियोजना च्या अभावाने गुजरात,मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांच्या सीमे वरशेकड़ो वाहने रोखण्यात आली त्या मुळे चारा पाणी अभावी शेकड़ो बकरे दगावली आणि या व्यवसायाशी निगड़ित असलेल्या शेतकऱ्यांचा, वाहतुकदारांचा आणि मुस्लिम बांधवांचे अतोनात नुकसान झाले.

बकरीईद मध्ये जे कुर्बानी केली जाते त्यातला बराच वाटा हा गोरगरीबांचा असतो.त्यांना त्यांचा वाटा देणे बंधनकारक असते. अश्या बिकट परिस्थिति मध्ये गोरगरीबांची मदतच होते. म्हणून शासनाने बकरी ईद च्या तोंडावर महाराष्ट्राच्या सीमेवर बकरे वाहतुक करणाऱ्या वाहनांना विनाकारण ताटकळत न ठेवता कोविड नियमानुसार वाहनांची तपासणी करुन तत्काळ सोडण्यात यावे.तसेच गेल्या वर्षी प्रमाणे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी या आशयाचे निवेदन मावळ तहसीलदारां मार्फत मा. मुख्यमंत्री यांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्रा च्या वतीने देण्यात आल.

ह्या वेळी मदत फाउंडेशन चे हाफ़िज़ अनवरअली,फरहद अत्तार आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे म. गौस सोनार, हुसैन शेख,सलीम शेख व बशीर शेख उपस्थित होते.

YOUR REACTION?