शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त चिंचोलीत वृक्षारोपण, देहूरोड मध्ये स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना धान्य वाटप.
५५ व्वा वर्धापनदिनी ५५ विविध झाडाचे वृक्षारोपण तर ५५ गोर गरीबांना धान्य वाटप व ५५ गरीबांना प्रति १०० रुपये वाटप

देहूरोड दि. १९ जून.

 देहूरोड दि.१९ :- शिवसेना देहूरोड शहर व चिंचोली शाखेच्या वतीने शिवसेना ५५ व्या वर्धापन दिना निमित्त चिंचोलीत वृक्षारोपण व देहूरोड मध्ये स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना धान्य पिशव्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

 शिवसेना ५५व्या वर्धापन दिना निमित्त प्रारंभी चिंचोली पिर बाबा दर्गा परिसरात शिवसेना देहूरोड उप शहर प्रमुख संदीप बालघरे, चिंचोली शाखा प्रमुख संतोष बालघरे, विभाग प्रमुख गणेश सावंत, चिंचोली उप शाखा प्रमुख नितीन पिजंण,शिवसैनिक अमर केंजळे, राजेश भोजवार ,विनायक जाधव, बाळासाहेब जाधव यांचे हस्ते वड, पिंपळ,लिंब,अशा ५५ देशी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

 देहूरोड स्वामी विवेकानंद चौक उड्डाण पूला खालील आयोजित कार्यक्रमात शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजाभाऊ सांडभोर यांचे हस्ते कोरोना महामारी च्या काळात आपले प्राण धोक्यात घालून देहूरोड परिसर स्वच्छ करणारे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने नेमलेल्या स्वच्छता ठेकेदारा मार्फत कार्यरत ५५ महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना धान्य पिशव्यांचा वाटप करण्यात आले. तसेच शिवसेना देहूरोड उप शहर प्रमुख संदीप बालघरे यांनी ५५ गरीबांना प्रती १०० रूपये प्रदान केले. या कार्यक्रमात शिवसेना माजी शहर प्रमुख महेश धुमाळ, राजेश शेलार, सल्लागार बबनराव पाटोळे, विलास हिनकुले, देहूरोड विभाग प्रमुख शशिकांत सप्पागुरु, देहूरोड समन्वयक अरूण गोंटे, पिंपरी-चिंचवड वहातुक सेना प्रमुख कैलास करमारे,जैष्ठ शिवसैनिक मेहरबान सिंग,मावळ तालुका युवा अधिकारी विशाल दागंट, चिंचोली शाखा प्रमुख संतोष बालघरे,पार्शीचाळ शाखा प्रमुख सनी कदम,मामुर्डी साईनगर प्रमुख लालचंद शर्मा, देहूरोड संघटक संदीप गोंटे, शिवसैनिक राजेश भोजवार,अमर केंजळे, बाळासाहेब जाधव यांच्या सह शिवसेना महिला संघटिका रत्नमाला गोंटे,जेष्ठ शिवसेनिका लक्ष्मी आक्का मिणगी,रूद्राबाई घारे सहभागी होते.

 कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना उप शहर प्रमुख संदीप बालघरे, देहूरोड विभाग प्रमुख शशिकांत सप्पागुरू, चिंचोली शाखा प्रमुख संतोष बालघरे यांनी केले तर अरूण गोंटे यांनी सुत्रसंचलन केले. 

 वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?