आयुष्याच्या आखेर पर्यंत मानवता सेवा करेन :- तनवीर मुजावर
राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या वर विविध माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनंदनाचा वर्षाव

देहूरोड पुणे दि. १९. जून

देहूरोड पुणे दि. मानवतावादी थोर पुरुषांची प्रेरणा घेऊन ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून मानवता सेवा करीत आहे. जो पर्यंत प्राण आहे तो पर्यंत मी मानवता सेवा करेन असे उदगार ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी येथे केले. 

ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन संघटनेच्या वतीने संघटनेच्या जिल्हा कार्यालयात ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात त्यांच्या सत्काराला उत्तर देताना तनवीर मुजावर बोलत होते.

 या स़भारंभाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इम्तियाझ शेख होते. प्रारंभी संघटनेच्या वतीने तनवीर मुजावर यांना जिल्हा अध्यक्ष इम्तियाझ शेख, पुणे जिल्हा समन्वयक दिपक चौगुले, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बाबु नायडू यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आले.

 या वेळी तनवीर मुजावर यांचे महत्वपुर्ण मानवतावादी चळवळ आहे त्यांच्या माध्यमातून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करून मानवता सेवेची संधी दिली असे गौरव उदगार जिल्हा अध्यक्ष इम्तियाज शेख यांनी केली.

 जिल्हा समन्वयक दिपक चौगुले यांनी ही तनवीर मुजावर यांचे मानवतावादी कार्य गौरवास्पद आहे. असे दिपक चौगुले यांनी गौरवाउदगार केले. तर तनवीर मुजावर यांनी देहूरोड शहरात ह्युमन राईट्स असोसिएशनच्या माध्यमातून मानवतावादी कार्यकरणी चे कार्यक्षम संघटनेची बांधणी केली. त्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली. मावळ तालुका, दौंड तालुका असे ठिकाणी ही कार्यकर्ताना काम करण्याची संधी तळागाळातील कार्यकर्त्यांना दिली. असे कौतुक जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी केले. 

 संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी तनवीर मुजावर हे रात्र दिवस तळागाळातील सर्व सामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे अहोरात्र परिश्रम घेत आहेत आता पर्यंत महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अकोला, बीजापूर, पुणे असे अनेक ठिकाणी संघटना स्थापन केले व मला ही जिल्ह्या वरती नियुक्ती करुन संघटनेची व लोक सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्या मानवतावादी कार्याला माझा सलाम असे गौरव उदगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी केले.

 जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आभार प्रकट बाबु नायडू यांनी मानले. या वेळी संघटनेचे सदस्य चिंतन पटेल, नागेश साबळे, नफिस अन्सारी, अहमद समशीर आदि उपस्थित होते.

राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना संघटनेचे जिल्हा पदाधिकारी

राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना संघटनेचे जिल्हा पदाधिकारी

YOUR REACTION?