युवा सेना प्रमुख ,पर्यावरण, व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीबांना अन्नधान्य वाटप
वाढदिवसाच्या निमित्ताने ५०००० , झाडे लावण्याचा संकल्प सद्या ५०० झाले लावुन वाढदिवस साजरा

देहूरोड दि. १३. जून.

 देहूरोड दि. १३ जून. -: युवासेना प्रमुख व पर्यावरण , पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व  जनसेवा सप्ताह निमित्ताने  युवासेना प्रसारक  राजेश पळसकर व अनिकेत घुले युवासेना मावळ तालुका आधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड मध्ये गरजुनां अन्नधान्य वाटप करण्यात आले .

 कोरोनाच्या काळात ऑक्सिजन ची कमतरतेमुळे बरेच लोकांना आपले जीव गमवावा लागला आज पर्यावरण किती महत्त्वाचे आहे या दृष्टीकोणातुन पर्यावरण आबादीत राहावा या साठी ५०००० झाडे लावण्याचा संकल्प केला. या वेळी शिवसेनेच्या वतीने सद्या  लायन्स क्लब परिसरात ५०० झाडाचे वृक्ष रोपन करण्यात आले.  देहूरोड येथील शंकर मंदिर  परीसरात  युवासेना संपर्क कार्यालयात गरजूंना अन्नधान्य साहित्य वाटप करण्याचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

या आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये  शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ. शैलाताई खंडागळे, उपजिल्हा संघटिका सौ. वैशालीताई मराठे,  शिवसेना मावळ  तालुका समन्वयक रमेश जाधव, देहूरोड शहर संघटिका श्रीमती सुनंदाताई आवळे, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू  , शिवसेना सल्लागार श्री देवा कांबळे , विलास हीनुकुले, विभाग प्रमुख जयन् नायर, सौ निलमताई गावडे, सौ बायडाबाय जगताप, दांगट ताई,होते तर कार्यक्रमाचे आयोजन विशाल दांगट यांनी केले. 

या वेळी  संदीप भूम्बक, सोयल शेख, अहामद खान, कुणाल टक्के, राहुल यादव,अजय तुपे,इलियास शेख, आदित्य बारणे, यश दांगट,ओमकार दांगट,इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

YOUR REACTION?