निलम गोऱ्हे यांचा देहूरोड अत्याचार पिडीतेला आधार
वेळ पडल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा मी मदत करेन-: निलम गोऱ्हे

देहूरोड दि ६जुन.

 देहूरोड दि. ६ - : राज्य विधान परिषदेच्या उप सभापती व महिला शिवसेना उप नेत्या निलम गोऱ्हे यांनी देहूरोड अत्याचारीत पिडीता व कुटुंबांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. निलम गोऱ्हे यांनी पिडीतेच्या व कुटुंबाची म्हणने ऐकून वेळ पडल्यास माझ्याशी थेट संपर्क साथा मी मदत करेन असा आधार व दिलासा दिला. निलम गोऱ्हे यांच्या सुचने वरुन महिला उप जिल्हा संघटक वैशाली मराठे, विभाग संघटक मिना ढेरे, शिवसेना मावळ समन्वयक रमेश जाधव, विभाग संघटीका यामिनी फ्रान्सी, शिवसेना साईनगर शाखा प्रमुख लालचंद शर्मा यांनी अत्याचार पिडीता व तिच्या कुटुंबीयांची निलम गोऱ्हे यांच्याशी संवाद साधुन दिला.                     या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय नाईक पाटील. देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलासराव सोंडे यांनी तातडीने कारवाई करुन अत्याचारीत नराधमांना जेरबंद केले. 

 विशेष वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे

YOUR REACTION?