मागासवर्गीय पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ देहूरोड मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या  वतीने तीव्र निर्देशने
देहूरोड शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध

मागासवर्गीय पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ देहूरोड मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या  वतीने तीव्र निर्देशने 

 देहूरोडः आघाडी सरकारने मागासवर्गीय पदोन्नतील आरक्षण रद्द कैला त्या संदर्भात काढलेला शासन निर्णय असंविधानिक बेकायदेशीर आहे. आघाडी शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील तमाम मागासवर्गीयात असंतोष पसरला आहे. तो काळा शासन निर्णय त्काळ रद्द करण्यात यावा या आग्रही मागणी साठी देहूरोड शहर रिपब्लिकन पक्षाचे वतीने रिपब्लिकन देहूरोड शहराध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड ऐतिहासिक सुभाष चौकात रिपब्लिकन भिम सैनिकांनी तीव्र निर्दशने, जोरदार घोषणाबाजी ने देहूरोड बाजार दणानुन आघाडी शासनाचा तीव्र निषेध केला . या वेळी रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब भागवत, सिद्धार्थ चव्हाण, इंद्रपालसिंग रत्तु,दिलीप कडलक,बाबु दुधघागरे यांनी मनोगत व्यक्त करून आघाडी सरकार चा मागासवर्गीय विरोधी धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. 

या निषेध आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी सुरेश गायकवाड, अशोक चव्हाण, शंकर दोडमणी, पी.आर.चव्हाण, सुनिल कडलक,चंद्रभान गायकवाड, सहभागी होते. 

 वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?