"रक्षक वृत्त" वाहीनीच्या वतीने सुरक्षा रक्षक  समाज गौरव भुषण ने सन्मानित
सुरक्षा रक्षक भर्ती प्रक्रिया अद्याप नाही, जो पर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तो पर्यंत निर्णय होणे कठीण-:अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके

पुणे दि. ५ . जुन.

                                    पुणे दि. ५ -: कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावात पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षकांनी आपली जीवाची बाजी लावून कोरोना काळात कोरोना रुग्णांचे व त्यांचे नातेवाईकांना प्रत्येक अडी अडचणीत संकट समयी समोर जाऊन आपले प्राणांची परवाह न करता सेवा दिली. 

ससुन रुग्णालयात अनेक परगावी मधुन येतात उपाशी तपाशी असल्याने काही नातेवाईक चक्कर येऊन पडणे भोवळ येऊन पडल्याचे घटना घडले तर कोरोना लागण झालेल्या व्यक्ती आत असल्याने नातेवाईक यांना भेटण्यास मनाई करण्यात येत होते, तेव्हा सुरक्षारक्षक या नातेवाईकांचे म्हणने ऐकुन आणलेले औषध, डब्बा स्वतः सुरक्षारक्षक आत जाऊन देत होते. हे कार्य करताना मंडळाचे सुरक्षारक्षक ही कोरोनाग्रस्त झाले. या बाबत बरेच संघटनेचे नेते यांनी सुरक्षारक्षक यांना सुरक्षारक्षक कवच मिळावा असे शासन दरबारी निवेदना द्वारे, आंदोलन, उपोषण करून दाद मागितली, शासनाने म्हणने ऐकुन सुरक्षारक्षक यांना अतिआवश्यक सेवा मध्ये समाविष्ट केले व त्यांना ५० लाखाचा वीमा कवच जाहीर केले. पण मंडळाच्या वतीने अनेक ठिकाणी काम करत असताना काही सुरक्षारक्षकांनी आपले जीव गमावीले.

 शासनाने अद्याप यांचे नातेवाईकांना अजून ही रक्कम दिलेली नाही तरी ही आज पण मंडळाचे सुरक्षारक्षक आपली जबाबदारी पुर्णपणे पार पाडत काम करीत आहेत. या कोरोना काळात जीवाची बाजी लावणारे सुरक्षारक्षकांची दखल रक्षक न्युज हे वृत्त वाहीनीने घेतली व सुरक्षा रक्षक यांना समाज गौरव भुषण ने रक्षक वृत्त वाहीनीचे संपादक सतीश एस राठोड यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. 

या सन्मान कार्यक्रमा नंतर रक्षक न्युज वृत्त वाहीनीचे संपादक सतीश राठोड यांनी सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके यांच्याशी सुरक्षा रक्षक यांचे प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली. पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ्याच्या वतीने सन २०१९ भरती प्रक्रिया झाली पण अद्याप त्यांचे निर्णय घेण्यात आलेला नाही व निकाल जाहीर केले नाही त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या सुरक्षा रक्षकांचे नाराजगीचे सुर निघत आहे व त्यांचा निकाल कधी पर्यंत येईल असे संपादक सतीश राठोड यांनी मंडळाचे अध्यक्ष निखिल वाळके यांना विचारले असता कामगार आयुक्त माथाडी मंडळाचे सुचनेनुसार व आरक्षण नुसार भरती राज्यातील १४ मंडळाना लागु करण्यात आले असून माथाडी कामगार आयुक्त यांच्या सुचनेनुसार निकाल प्रक्रिया पार पडेल असे सांगितले. 

सद्या कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या महामारी मुळे या भरती चा निकालाला उशीर होत आहे जो पर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत नाही तो पर्यंत ही प्रक्रिया थांबविण्यात आले आहे. या वर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व भरती मध्ये उत्तीर्ण झालेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय द्यावा अशी राठोड यांनी आपले मत मांडले. 

या वेळी ससुन रूग्णाल्याचे भूलतज्ज्ञ विभागाचे (एच.ओ.डी.) डॉ. संयोगिता नाईक, ससुन रूग्णाल्याचे एस.ओ. विनायक पाटील, मंडळाचे निरिक्षक राजेंद्र कदम, दिपक काटकर ,संजय आढाव, मंडळाचे सुरक्षा अधिकारी सुपेकर, सुरक्षा रक्षकांचे मनसे नेते चंद्रकांत गायकवाड, परमेश्वर वाव्हळ, तुकाराम कुंभार, मनोज पवार, महिला सुरक्षा रक्षक अनिता जगताप आदि उपस्थित होते.

YOUR REACTION?