रावेत, किवळे प्रभागातील मुलभुत समस्या पुर्तीसाठी ८जुन पासून आमरण उपोषण अंदोलन सुरू करणार असल्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना ईशाराः माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे.
मागील दहा वर्षां पासुन पालिकेच्या अधिकारी यांचे फक्त पोकळ आश्वासने ,उपोषणा दरम्यान काही झाले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जबाबदार

पुणे दि. ४ जुन.

 देहूरोडः रावेत किवळे प्रभाग १६ मधील मुलभूत समस्या पुर्तीसाठी अनेकदा विनंती निवेदने देऊन ही पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप समस्या पुर्ती न केल्याने मुलभुत समस्या पुर्तीसाठी येत्या ८जुन पासुनआमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना कार्यक्षम माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मा.नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रभाग१६ किवळे दत्त नगर,सरपंच वस्ती,येथील अद्याप पर्य़त डी.पी.रस्ता होत नाही. दत्त नगर,संरपंच वस्ती येथील अंतर्गत रस्त्यातील अपघात ग्रस्त धोकादायक विहीर अद्याप पर्यंत बुजविले जात नाही. किवळे सरपंच वस्तीच्या ओढ्या शेजारचा नागरिकां साठी केलेला अर्धवट रस्ता अद्याप पुर्ण झालेला नाही. हि विकास कामे अनेक वर्षा पासुन ‌प्रंलबित आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड,आशीष शर्मा.महापालिकेचे अधिकारी यांनी पाहणी करुन गेले पण फक्त अश्र्वासने देतात. गेली १० वर्षं सतत पाठ पुरावा करून ही समस्या पुरवणी होत नाही.त्या मूळे जो पर्यंत वरील समस्या पुर्ती होत नाही तो पर्यंत येत्या मंगळवार दि. ८जुन रोजी सकाळी १० वा. किवळे सरपंच वस्ती डी.पी.जवळ आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार आहे.होणार्या परिणामाला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन जबाबदार राहिलं असा इशारा या.नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी दिला आहे. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र पिंपरी चिंचवड पुणे.

YOUR REACTION?