खाकी वर्दीतील देवदूत विलास सोंडे यांच्या तप्तरतेने देहुतील रूग्णालय व अतिगंभीर रुग्णावरचे संकट टळले.
गैस वितरकाच्या असहकार्यामुळे रूग्णालय आणी रूग्णावर संकट, ऐनवेळी खाकी वर्दीतला दैव माणुस अवतरला आणि रुग्ण, रुग्णालयवरचा संकट टळला

 श्री क्षेत्र देहू दि. २६ -: श्री क्षेत्र देहूतील युनीकेअर रूग्णालयातील शनिवार दि.२४ एप्रिल सकाळचा थरारक प्रसंग ३० खांटाचे देहूत युनीकेअर रूग्णालय आहे.त्या रूग्णालयात सध्या दाखल अति गंभीर रूग्णावर उपचार चालू आहेत. या रुग्णालयात दररोज ३२ सिलेंडर लागतात.पण शनिवारी फक्त सकाळी अर्धा तास पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला.त्यामुळे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जोशी यांना सिलेंडर वितरकाची सहकार्य न मिळाल्याने रुग्णालय व अति गंभीर रुग्णांवर आ वासुन संकट समोर ठाकले.अशा संकट समयी डॉ सुहास जोशी यांनी पिंपरी चिंचवड विभागीय अप्पर तहसिलदार गीता गायकवाड यांच्याशी संपर्क साधुन सिलेंडर विना रूग्णालय व रुग्णालयातील अति गंभीर रुग्णांवर आलेल्या संकटाची प्रसंग कथन करून आपण सिलेंडर सोय करावी अशी विनंती केली. तेंव्हा अप्पर तहसिलदार यांनी लगेच देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलासराव सोंडे यांच्याशी संपर्क साधुन त्यांनी सिलेंडर विना रुग्णालय व रुग्णांवर आलेल्या संकट सांगुन आपण सिलेंडर उपलब्ध करून देऊन आलेले संकट टाळण्याचे सुचना दिल्या. गंभीर परिस्थिती हाताळण्यात मातब्बर असलेले देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलासराव सोंडे यांनी क्षणार्धात तत्परतेने संपर्क साधुन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम स्वरुप हरितवाल,निगडी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, मावळते नगरसेवक हाजीमलंग मारिमुत्तू, तळवडे वर्कशॉप अशी क्षणार्धात १२ सिलेंडर मिळाले. आणि खाकी वर्दीतील देवदुत विलासराव सोंडे यांच्या कार्य तप्तरतेने युनीकेअर रुग्णालय व अति गंभीर रूग्णांवरचे जीवन मरणाचे संकट टळले. व सिलेंडर पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने डॉ सुहास जोशी यांनी आलेल्या रूग्णालय व रूग्णालयातील अती गंभीर रूग्णांवरील आलेले संकट टाळलं त्या बद्दल देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलासराव सोंडे, पिंपरी-चिंचवड विभागाच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड. व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. 

 विशेष वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र श्री क्षेत्र देहू पुणे.

YOUR REACTION?