४९० ग्रॅम गांजा सह तरूणाला देहुरोड पोलीसांनी केले अटक.
एकुण १४ हजार १०० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त.

देहुरोड दि. २१ :- आज काल गांजा बागळने गांजा विकण्याचे प्रमाण खुप वाढले आहे असे गांजा बागळऱ्या एका तरूणाला देहुरोड पोलीसांनी अटक केले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील उड्डाणपुलावर तरुणाला ४९० ग्रॅम वजनाचा गांजासह तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी देहुरोड पोलिसांनी केली आहे.

विजयकुमार श्रीकृष्ण चौधरी (वय वर्ष ३०, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजयकुमार याने बंटी साळुंके (रा. दांडेकर पूल, पुणे) यांच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गांजा बाळगल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करून विजयकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११ हजार ५०० रुपये किमतीचा ४९० ग्रॅम गांजा, दोन हजारांचा भ्रमणध्वनी फोन, ६०० रुपये रोख रक्कम असा एकूण १४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबत देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

•••••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. 

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?