वाढत्या कारोना प्रार्दुभावा मुळे  देहूरोड काही भाग सिल
कोरोनाच्या पाश्वभुमीवर हातगाडी व्यवसायकांवर अतिक्रमण, कुठले ही सुचना परिपत्रक न काढता अचानक कार्यवाही लोक संतप्त

                            देहूरोड दि. ७ -: देहूरोड कॅंन्टोमेंन्ट बोर्ड हद्दीत वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे, पारशीचाळ, संकल्प नगरी, थॉमस कॉलिनी, चिंचोली, झेंडेमळा, दत्तनगर, शिवाजी नगर, मधुर सोसायटी, रॉयल कॉम्प्लेक्स, बॅक ऑफ इंडिया जवळील ऐलोरा रेसिडेन्सी, व  जुना मुंबई पुणे  महामार्ग राजु मुद्रांक विक्रेता  पर्यंत चा  भाग आज कॅंन्टोमेंन्ट बोर्डा ने मायक्रो कंन्टमेन्ट झोन जाहीर केले आहे. कॅंन्टोमेन्ट बोर्डा ने हा संपूर्ण भाग नियंत्रण कक्षा खाली घेतला  आहे .तसेच वरील सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे . चिंचोली, थाॅमस काॅलीनी, भाटीया इमारत, झेंडे मळा, पारशीचाळ, दत्त नगर, संकल्प नगरी मयुर सोसायटी, रॉयल कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, मरीमाता वसाहत, ऐलॉरा रहिवासी भाग पुर्ण पणे सील करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कंमाडर राम स्वरुप हरितवाल यांनी दिली. तसेच देहूरोड हद्दीतील नागरिकांनी विना कारण घराच्या बाहेर पडु नये. प्रशासनाला सहकार्य करावे .असे त्यांनी नागरिकांना  आवाहन केले आहे.        देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्यांनी  आज पोलिस बंदोबस्तात  हाॅटेल सवाना  समोरील उड्डाण पुला खालिल व त्या परीसरातील बाजार पेठ येथे अनधिकृत हातगाड्यावर कारवाई करुन ताब्यात घेतले. या मध्ये काही परवानाधारक हातगाडीवर ही कारवाई झाल्याने हातगाडी मालकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकारी यांना जाब विचारून संताप व्यक्त केला.  वरील अधिकार्यांचे आदेशानुसार आम्ही कारवाई केले असे हात झटकुन अधिकारी मोकळे झाले. 

YOUR REACTION?