क्रिकेट बेटिंग प्रकरणी चार आरोपी पिंपरी चिंचवड पोलीसाच्या ताब्यात
मोठे आतंरराष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता -: आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी चिंचवड दि. भारत इंग्लंड क्रिकेट बॅटिंग दरम्यान ३३ क्रिकेट सट्टेबाजांना पिंपरी चिंचवड वाकड पोलिसांनी देहूरोड गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे सुरू असलेल्या भारत इंग्लंड मॅच वरती सट्टा लावणारे आंतरराष्ट्रीय टोळीवर मोठी कारवाई केली होते. त्यात ४५ लाख रुपये सहित कॅमेरे दुर्बिन लॅपटॉप चार चाकी वाहन ७४ भ्रमणध्वनी विदेशी नोटा असे मुद्देमालासह तीन वेगवेगळ्या ठिकाणे छापे मारुन ३३ जणांना अटक केली होते. या प्रकरणी आता आणखी चार सट्टेबाजांना पिंपरी चिंचवड, पोलिसांनी अटक केल्याने आरोपींची संख्या आता ३७ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बेटिंगचे जाळे पसरल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. शुक्रवार दिनांक २६/३ रोजी घोडेश्वर डोंगर आणि पुण्यातील लेमनट्री हॉटेल आणि स्टेडियम जवळ हाईराइज ईमारत बिल्ड ट्रॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या इमारतीवर सोहळा मजल्यावरती हा बेटिंग प्रकार चालू होता, व कोट्यावधी रुपयाचा सट्टा लावला जात होता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी ३३ आरोपींना अटक करून ४५ लाख ३७ हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट चार तपासा दरम्यान अटक केलेल्या बुक्की चे महत्त्वपूर्ण डाटा असलेला चार भ्रमणध्वनी व सन बेट्स या ॲपचा सोर्स कोड असलेला कंम्प्युटर जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी हे तांत्रिक बाबी च्या आधारे ग्राहकांची मोठी फसवणूक करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत होते सदर प्रकरणाचे धागेदोरे मुंबई, दिल्ली, नागपूर, जयपूर, हरियाणा, गोवा असा बीटिंग लावणारे बुक्की पर्यंत धागेदोरे जात आहे, या करिता पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार पथके तयार करण्यात आली आहेत या प्रकरणी भारतातील मोठ्या मोठ्या बुकीचं नावे समोर येत आहेत त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे पसरल्याचे शक्यता आहे. या अटक आरोपी मध्ये आठ आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोठा सावट आहे. कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, एक दिवसीय तीन आंतरराष्ट्रीय सामने पुण्यात पूर्वनियोजित असल्याने हा सामना रद्द होणे शक्य नव्हते व कोरोना मुळे या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना क्रिकेट बघण्यास बंदी घालण्यात आले होते. केवळ दोन्ही क्रिकेट संघातील खेळाडू आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आत प्रवेश दिला गेला होता. जर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नसता तर हे बेटीग सट्टेबाजांनी स्टेडियम मध्ये प्रवेश घेऊन सामन्याचा थेट प्रसारण केला असता. आणि कोणालाही शंका देखील आले नसते, पण कोरोनाचा जास्त प्रमाणात वाढल्याने प्रेक्षकांना बंदी असल्याने त्यांचा डाव धुळीस मिळाला व ते असफल झाले. 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख ,सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम आणि गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस अंमलदार हे पुढील तपास करीत आहेत. 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

YOUR REACTION?