भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


पुणे दि. २७

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मेघना साबडे प्रस्तुत  ' सक्षम'  या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नृत्यांजली अकॅडमी आणि अभिव्यक्ती कथक नृत्यसंस्थेतील शिष्यांचे सामूहिक भरतनाट्यम,कथक नृत्याचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. सुदीक्षा अनंतरमन यादेखील  भरतनाट्यम सादर करणार आहेत.हा कार्यक्रम गुरुवार, ३०  जून  २०२२ रोजी सायंकाळी ६.१५  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.

 हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १२७ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'सक्षम ' या कार्यक्रमाचे आयोजन मेघना साबडे यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख दिपक बिडकर यांनी प्रबोधन माध्यमातून प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

YOUR REACTION?

Facebook Conversations