सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार संरक्षण मंत्रालयाच्या संबंधित अधिकार्यांच्या तातडीच्या बैठकित ठोस निर्णय घेऊ :-  खासदार श्रीरंग आप्पा बारणे.
बोधिसत्व जन जागृती संघाच्या शिष्टमंडळाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आश्वासन.

 

 देहूरोड  दि. १८ :- बोधिसत्व जनजागृती संघाच्या शिष्टमंडळाने महा संसदरत्न.खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाच्या आदेशानुसार ऐतिहासिक बुद्ध विहार ( बुध्द भुमी ) देहूरोड , बुद्ध विहाराच्या जागेवर मालकीहक्क म्हणून मिरवणारे टेक्सास गायकवाड व इतर यांचे नावे संरक्षण खात्याच्या , संबंधीत असणाच्या खात्याच्या दप्तरी नोंद आहे ती नावे तातडीने कमी करावीं. त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे मालक सदरी दप्तरी नोंद करण्यात यावे , अशी मागणी निवेदनात मांडले आहे. 

या निवेदनात मांडलेल्या मागणी बाबत संघाच्या पदाधिकार्यां समवेत खासदार . श्रीरंग आप्पा बारणे यांनी विस्तृत चर्चा केली खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या निवेदनातील मागणीची दखल घेवून या मागणी संबंधी संरक्षण मंत्रालयाच्या संबंधीत खात्याच्या अधिकार्यांशी तातडीची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आदेशा नुसार योग्य निर्णय घेवू असे ठोस आश्वासन, शिष्टमंडळाला दिले.

 या शिष्टमंडळात बोधिसत्व जनजागृती संघाच्या अध्यक्षा. संगिता अशोक वाघमारे, उपाध्यक्ष परशुराम दोडमणी, सचिव विजय पवार, कार्याध्यक्ष. श्रीकांत दत्ताजी चोपडे, सह, खजिनदार शशिकांत वि. चव्हाण, युवा नेते गणेश जावळेे, युवा नेते उद्योजक सागर लांगेे, संघाचे ज्येष्ठ व आंबेडकरी चळवळीचे नेते रविंन्द्रजी चोपडे , संघाचे आधारस्तंभ अशोकदादा वाघमारे सहभागी होते.

 वृत्त संपादक अशोक कांबळे. 

YOUR REACTION?