देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासकपदी ॶॅड कैलास पानसरे यांच पदग्रहण संपन्न.
कैलास पानसरे यांच्यावर विविध संघटनांच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

 

देहूरोड दि. १८- संरक्षण मंत्रालयाकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासक पदी नियुक्ती झालेले एडवोकेट कैलास पानसरे यांचा देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सभाग्रहात पदग्रहण समारंभ संपन्न झाला. 

 देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ब्रिगेडियर अमन कटोच यांनी कैलास पानसरे यांना प्रशासक सदस्य पदाची शपथ दिली. ते ॶॅड कैलास पानसरे यांनी ग्रहण केले. यावेळी माजी राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल उपस्थित होते. 

शपथ ग्रहण केल्यानंतर कँन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष अमन कटोच यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, भाजप अध्यक्ष बाळासाहेब शेलार ,गुरमीत सिंग रतू हे दालनात उपस्थित होते.

 पदभार स्वीकारल्यानंतर ॶॅड कैलास पानसरे यांनी देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चंद्र बोस चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, कॅन्टोन्मेंट रूग्णालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी रिपब्लिकन पक्षाचे देहूरोड शहराध्यक्ष सुनील गायकवाड, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, इन्‍द्रपाल सिंह रतू, अशोक चव्हाण उपस्थित होते. 

देहू रोड दत्त मंदिरात देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट कृष्णा दाभोळे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा पक्षाचे नेते बाळासाहेब शेलार, इन्‍द्रपाल सिंग रतू, शिवाजी दाभोळे, अंजली बत्तल, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्षा सारिकाताई नाईकनवरे, अमोल नाईकनवरे, इतर महिला नेत्या उपस्थित होत्या. 

वृत्तसंपादन अशोक कांबळे .

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 7219500492/9767508972

YOUR REACTION?