सायकल वरुन गस्त उपक्रमाचे स्वागत व शुभेच्छा .

देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलासराव सोंडे त्यांच्या सहकार्यासह सायकलवर देहूरोड हद्दीत गस्त.

देहूरोड दि.४ जून

 देहूरोड ः पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या आयुक्तालयातील गुन्हेगारां वर जरब ,जनतेशी सुसंवाद आणि पोलिसांचे आरोग्य सुदृढ व्हावे या दृष्टीने पोलिस अधिकारी व पोलिसांनी सायकल वरून आपल्या पोलिस हद्दीत गस्त घालण्याचे स्तुत्य उपक्रम सुरु केले.या उपक्रमांसाठी त्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याला सायकली पुरविल्या. त्याच उपक्रमातुन देहूरोड पोलिस ठाण्याला आलेल्या सायकली वरून देहूरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलासराव सोंडे त्यांच्या सहकार्यासह देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायकली वरुन गस्त घालुन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. याच उपक्रमांतर्गत देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलासराव सोंडे आपल्या सहकार्यासह सायकलवर देहूरोड हद्दीत गस्त घालुन परत देहूरोड पोलिस ठाण्यात परतत असताना महामार्गावर देहूरोड भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मुख्य चौकातून जात असताना तेथे जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते इंद्रपालसिंग रत्तु,रिपब्लिकन पक्ष देहूरोड शहराध्यक्ष सुनिल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड सेवा दलाचे अध्यक्ष रेणु रेड्डी, नगरसेवक व देहूरोड कॉग्रेस कमिटीचे देहूरोड शहराध्यक्ष हाजीमलंग मारिमुत्तु,सामाजिक कार्यकर्ते सुरेश लांगे,आदीनी त्यांचे स्वागत करून स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.                 

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी रज्जाक शेख महाराष्ट्र देहूरोड पुणे.