मावळ लोकसभेमध्ये बापाला आणि बारामती लोकसभेत पतीला प्रचारात उतरावे लागते - संजय राऊत

निवडणूक आयोग ही भाजपाची स्टॅंडर्ड शाखा झाली आहे. पण राज्यात ३५ जागा हे महाविकास आघाडीला नक्की मिळणार.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

मावळ दि. २८ :- मावळ लोकसभेमध्ये बापाला आणि बारामती लोकसभेत पतीला प्रचारात उतरावे लागते याचा अर्थ पराभव निश्चित होणारं आहे. असा टोला शिव सेना ठाकरे गटांचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

संजय राऊत यांच्या हस्ते आज मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर त्याच बरोबर अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोग ही भाजपाची स्टॅंडर्ड शाखा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टर शासकीय यंत्रणांच गैर वापर प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्यावर निवडणूक आयोग कोणतेही कारवाई करत नाही. अशी टीका देखील संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी दाखवला आहे. नांदेडच्या ज्या एका जागेसाठी भाजपने अशोक चव्हाण यांना आपल्याकडे घेतलं होत, ती नांदेड ची जागा देखील आम्ही जिंकत आहोत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मावळ चे खासदार श्रीरंग बारणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि आज त्याच श्रीरंग बारने यांच्या प्रचारासाठी अजित पवार मावळा आले होते यावर मावळ मध्ये श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार बारणे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यावर मावळ मध्ये बापाला आणि बारामती मध्ये पतीला प्रचारात उतरावे लागते याचा अर्थ पराभव नक्की आहे . असे म्हणत अजित पवार यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.